Main Featured

धक्कादायक! देशात दिवसाला ८७ बलात्कार, अत्याचारात ७ टक्क्यांनी वाढ

rape caseउत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात झालेल्या बलात्काराच्या (rape case)घटनेने देशभरात तिव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच देशात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणाची आकडेवारी समोर आली आहे.

२०१९ साली प्रत्येक दिवसाला देशात सरासरी ८७ बलात्कार (rape case) झाल्याचे समोर आले आहेत. २०१८ च्या तुलनेत अत्याचाराची ही संख्येत सात पटीने वाढ झाली आहे. २०१९ ह्या एका वर्षात ४ लाख ५ हजार ८६१ गुन्हे दाखल झाले आहेत.

Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये देशात महिलांवरील अत्याचाराच्या ३ लाख ७८ हजार २३६ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये बलात्काराचे एकूण ३२ हजार ३३ गुन्हे नोंदवले गेले. याची वार्षिक टक्केवारी ७.३ टक्के होते. २०१९ मध्ये एकूण २८ हजार ९१८ हत्याप्रकरणांची नोंद झाली असून जी २०१८ च्या तुलनेत ०.३ टक्क्यांनी कमी आहे.

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, या आकडेवारीत पश्चिम बंगालने माहिती दिलेली नाही. त्यामुळे २०१८ च्याच माहितीचा यात वापर केल्या सांगण्यात आले आहे. कोरोना (corona)काळातही सर्व माहिती गोळा केलेल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी आभार मानले. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत एनसीआरबी देशभरातील गुन्हेगारीच्या घटनांची माहिती गोळा करण्याचे काम करते. या संस्थेने ३६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि ५३ महानगरांची माहिती एकत्रित करून हा अहवाल तीन भागात तयार केला आहे.