Main Featured

आत्महत्येसाठी पाण्याच्या टाकीवर चढला नगरसेवक


corporator-company-On-the-water-tank-for-suicide

corporator company मधमाश्या (honeybee) ज्यांच्या पोळ्याला थोडा जरी धक्का लागला तरी त्या थेट हल्ला करतात. अशाच मधमाश्यांनी एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, मात्र हे खरं आहे. उत्तराखंडमधील Uttarakhand नगरसेवकाला या मधमाश्यांनी आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे. पाण्याच्या टाकीवर चढून हा नगरसेवक आत्महत्येची धमकी देत होता.

ही घटना आहे हल्द्वानीतील. गांधीनगरचे नगरसेवक रोहित कुमार (rohit kumar) खासगी शाळांमधील फीविरोधात गेल्या 43 दिवसांपासून धरणं धरून बसलेत. त्यांनी आमरण उपोषणही केलं. त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी नेत्या इंदिरा हृदयेश तिथं पोहोचल्या. मात्र त्याआधीच रोहित कुमार पाण्याच्या टाकीवर चढले होते. ते कुणाचंच काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. आपल्या मागण्या पूर्ण होत नसतील तर आपण टाकीवरून खाली उडी मारून आत्महत्या करू अशी धमकी ते देत होते.

आत्महत्येची धमकी देत असतानाच रोहित कुमार यांचा हात टाकीवरील मधमाश्यांच्या पोळ्यावर पडला. मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. रोहित कुमार यांच्यासह आठ तरुणांना मधमाश्यांनी चावा  घेतला. आधी आत्महत्येची धमकी देणारे रोहित कुमार मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर जीव मुठीत धरून खाली उतरले.

रोहित कुमार यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आलेल्या नेत्या इंदिरा हृदयेश आणि आंदोलनस्थळी असलेले पोलीस सर्वजण आपल्या गाड्या घेऊन तिथून पसार झाले. शिवाय रोहित कुमार जेव्हा आत्महत्येसाठी टाकीवर चढले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी शेकडो लोक तिथं जमले होते. मधमाश्यांनी हल्ला करताच हे सर्व जण लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले.

रोहित कुमार यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला असला तरी आत्महत्येची धमकी देणाऱ्या रोहित कुमार यांचा त्यांनी अप्रत्यक्षरित्या जीवच वाचवला आहे. कित्येक लोकांना त्यांना खाली उतरण्याची विनंती केली मात्र त्यांनी ऐकलं नाही. जे कुणालाच जमलं नाही ते मधमाश्यांनी करून दाखवलं. मधमाश्यांनी या नगरसेवकावर हल्ला केला मात्र त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे.