Main Featured

अखेर चीनने जगासमोर आणली आपली पहिली लस!


                                     china first corona vaccine

करोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशीची सगळ्या जगाला प्रतिक्षा आहे. काही लशींची (coronavirus vaccine updates) चाचणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. अशातच चीनने आता आपली करोनावरील लस सगळ्या जगासमोर आणली आहे. ही लस चीनमधील सिनोवॅक बायोटेक (Synovac biotechआणि सिनोफार्म या कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.


सिनोवॅक बायोटेक आणि सिनोफार्म यांनी विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप सुरू आहे. या लशीची सर्व टप्प्यातील चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर बाजारात लस उपलब्ध होणार आहे. या वर्षाखेरपर्यंत लस उपलब्ध (coronavirus vaccine updates) होणार असल्याची दाट शक्यता आहे. सिनोवॅक कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या लशीच्या उत्पादनासाठी एक कारखाना तयार ठेवण्यात आला आहे. या कारखान्यात दरवर्षी ३०० दशलक्ष डोस निर्मिती करण्याची क्षमता आहे. सोमवारी चीनने ही लस बीजिंग ट्रेड फेअरमध्ये प्रदर्शित केली. या लशीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.


जगभरात जवळपास १० लशींची चाचणी ही क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. या १० लशींमध्ये चीनच्या या लशीचाही समावेश आहे. करोनाच्या संसर्गाशी जगभरातील सर्वच देश दोन हात करत आहेत. करोनामुळे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाले(coronavirus vaccine updates) आहेत. त्यामुळे संसर्गाला अटकाव करणारी लस लवकरात लवकर विकसित व्हावी यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत.

Must Read

1) प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

2) प्रतीक्षा संपली! याच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियानं केलं जाहीर

3) मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकाने सहा जणांना उडवले, एकाचा मृत्यू

4) CSK नंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह

5) काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र

करोनाच्या संसर्गाला चीनला जबाबदार ठरवण्यात येत आहे. चीननेच करोना विषाणूची निर्मिती केली असल्याचा आरोप अमेरिकेसह इतर देशांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लस विकसित करून चीन जगाला दिलासा देण्याचा (coronavirus vaccine updatesप्रयत्न करत आहे. चीनने एक महिन्याआधीच काही नागरिकांना ही लस दिली होती. चीनमध्ये २२ जुलैपासून काही नागरिकांना लस देण्यात असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली. या लशीचा कोणताही साइड इफेक्ट झाला नसल्याचा दावा चीनच्या आरोग्य विभागाने केला आहे.


दरम्यान, चीनमधील कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीची चाचणी पाकिस्तानसह चार देशांमध्ये होणार आहे. चायना नॅशनल बायोटेक ग्रुप (सीएनबीजी) आणि सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेड यांनी तयार केलेल्या करोना(coronavirus vaccine updates) विषाणूवरील लशींची मानवी चाचणी पाकिस्तानसह इतर चार देशांमध्ये होणार आहे. सध्या लस स्पर्धेत चीन आणि ब्रिटनची ऑक्सफर्डने विकसित केलेली लस आघाडीवर आहे.