Covid-19 Infected


भारतात कोरोनाव्हायरस (Covid-19 Infected) संक्रमितांची संख्या आता 61 लाख 45 हजार 292 झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. 24 तासांत देशात 70 हजार 589 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 85 हजार 194 रुग्ण निरोगी झाले.


दुसरीकडे कोरोना संक्रमितांमध्ये 60 लाखांचा आकडा पार करणारा भारत (India)  हा जगातला दुसरा देश आहे. भारताआधी अमेरिकेनं हा आकडा पार केला होता. तर, 24 तासांत देशात 776 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 96 हजार 318 झाली आहे. तर, आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 47 हजार 576 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

भारत जगातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण (Covid-19 Infected)असलेल्या देशांमध्ये आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, सर्वात जास्त मृतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, भारतात दुसऱ्या क्रमांकाचे अॅक्टिव्ह केसेस आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 82.74% झाला आहे.


गेल्या 24 तासांत जगात 2 लाख 28 हजार नवीन प्रकरणं समोर आली. तर, 2 लाख 36 हजार रुग्ण निरोगी झाले आहेत. 3 हजार 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरनुसार जगभरात आता 3 कोटी 35 लाख रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 10 लाख 6 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.