Main Featured

नवीन रुग्णांपेक्षा आजही निरोगी रुग्ण जास्त

Done! 86061 in one day

भारतातील एकूण कोरोनाबाधितांची (Covid-19 Infected) संख्या आता 62 लाख 25 हजार 764 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची 80 हजार 472 नवीन प्रकरणं समोर आली. तर, एकाच दिवसात 1179 लोकांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 97 हजार 497 झाली आहे. तर, 24 तासांत 86 हजार 061 रुग्ण निरोगी झाले. आतापर्यंत एकूण 51 लाख 87 हजार 826 रुग्ण निरोगी झाले आहेत. सध्या देशात 9 लाख 40 हजार 441 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिन राजेश भूषण यांनी दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये सांगितले की, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर दरम्यान 29,082 लोकांचा सर्व्हे केला गेला, यात 6.6% लोकांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सर्व्हेनुसार ऑगस्टमध्ये 10 वर्षांहून अधिक वयोगटातील प्रत्येक 15 मधील एकाचा कोरोनाची लागण झाली आहे.इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार (ICMR) 29 सप्टेंबरपर्यंत एकूण 7 कोटी 41 लाख सॅंपल टेस्ट करण्यात आले. यातील 11 लाख सॅपलची टेस्टिंग काल करण्यात आली.


Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

मृत्यूदरात घट

दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदर आणि अॅक्टिव्ह रेट यांच्यात घट झालेली पाहायला मिळत आहे. मृत्यूदर सध्या 1.57% झाला आहे. तर, अॅक्टिव्ह रेट 15% आहे. यासह देशाचा रिकव्हरी रेट वाढत आहे. सध्या रिकव्हरी रेट 83% आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे.

जगभरात काय आहे परिस्थिती ?

जगभरात सध्या 3 कोटी 35 लाख 49 हजार 873 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यांपैकी 10 लाख 6 हजार 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे 2 कोटी 48 लाख 78 हजार 124 रुग्ण निरोगीही झाले आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझिल हे तीन देश सर्वात जास्त प्रभावित आहेत.