Main Featured

चिंता वाढली! कोरोनाचं रुप पुन्हा बदललं

Coronavirus

देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसागणीक वाढत आहे. मात्र कोरोनाव्हायरसमध्ये होत असलेल्या बदलांमुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. प्लेटलेट्स (Platelets) सामान्यत: डेंग्यूच्या तापात (Dengue Fever) कमी होतात, मात्र आता कोरोना रुग्णांमध्येही अशीच लक्षणं दिसू लागली आहेत . कोरोनाची लागण झालेल्या पेशंटची प्लेटलेटची संख्या 20 हजारांपेक्षा कमी होताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा रुग्णाची डेंग्यूची तपासणी केली जाते, तेव्हा एकाही रुग्णांत डेंग्यूची लक्षणे दिसली नाहीत.


पीजीआय लखनऊचे प्रोफेसर अनुपम वर्मा म्हणाले, की कोरोना रूग्णांमध्ये आता डेंग्यूसदृश लक्षणे दिसू लागली आहेत. ही लक्षणं चिंतेची बाब आहे. ते म्हणाले की, अचानक प्लेटलेट्सची  (Platelets) संख्या कमी होत असल्यामुळे रुग्णांवर उपचार करणे खूप कठीण होत आहे.

Must Read







तपासणीत असेही दिसून आले आहे की, कोरोना रुग्णाच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरही परिणाम करते, यात मोनोसाइड्स आणि मॅक्रोफेजेस पेशींवर हल्ला करतात. यामुळे प्लेटलेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया कमी होते. म्हणूनच रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होते.
अशा रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना प्लेटलेट्स देण्यात येत आहेत. अशा रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देखील दिली जाणे आवश्यक आहे. डॉ. अनुपम म्हणाले की कोरोनामध्ये असा बदल दिसून आला आहे. पूर्वी कोरोना रुग्णांना थ्रोम्बोसिस होता. यात, रुग्णाच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात, ज्यासाठी त्याला टीपीए इंजेक्शन दिले गेले.