Main Featured

धक्कादायक! भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा कोरोना


coronavirus-BJP-MP-infected-with-corona

corona virus नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील BJP MP Pratap Patil चिखलीकर यांना एका महिन्यातच दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑगस्ट महिन्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होता. उपचारानंतर कोरोनावर मात करण्यात ते यशस्वी झाले. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

पहिल्यांदा कोरोनाची corona लागण झाल्यानंतर चिखलीकर यांनी औरंगाबाद येथे उपचार घेतले होते. नंतर ते नांदेडला आले. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. संसदेच्या अधिवेशनापूर्वी नांदेडमध्ये 7 तारखेला पुन्हा त्यांची चाचनी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर ते दिल्लीला गेले. अधिवेशनापूर्वी पुन्हा त्याची चाचणी झाली आणि त्यामध्ये ते पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

सध्याखासदार चिखलीकर यांची प्रकृती उत्तम असून आता ते दिल्ली येथील निवासस्थानी आहेत. त्याच ठिकाणी ते उपचार घेणार आहेत. पण कोरोनाची दुसऱ्यांदा लागण होत असल्यानं लोकप्रतिनिधींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

शिवसेनेच्या 4 खासदारांनीही झाली लागण

महाराष्ट्रातील अन्य चार खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे. लोकसभेतील हे चारही खासदार शिवसेनेतील आहेत. लोकसभा सचिवालय यांच्या वतीने करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये या खासदारांची चाचणी सकारात्मक असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रतापराव जाधव, हेमंत गोडसे, विनायक राऊत आणि सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे.