Main Featured

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे अठराशे रुग्ण दाखल


corona-virus-vaccine-eighteen-hundred-corona-patients

corona virus vaccine कोरोनाची corona रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम आहे. शुक्रवारी (दि. ११) जिल्ह्यात अठराशे नवीन रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ५० हजार ७६०च्या घरात गेली आहे. १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११३० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात In the district कोरोनाबधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी १५ रुग्ण दगावले त्यात नाशिक शहरातील आठ, मालेगावात पाच, तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मृतांचा आकडा १ हजार ३५ वर पोहोचला आहे. शहरात ५८४, तर ग्रामीणमध्ये ३०३ बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ८०२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ४७१ रुग्ण शहरातील आहे. संशयित रुग्णांसह बाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. १ लाख २६ हजार ९५६ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ७९८ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.