Main Featured

कोल्हापूरात स्वॅबचा अहवाल मिळणार आता मोबाईलवर

Kolhapur swab test report on mobileKolhapur- छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयासह सरकारी रूग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी दिलेल्या स्वॅबचा अहवाल (swab Test)आता संबंधितांच्या मोबाईलवरच मिळणार आहे. यासाठीचे तंत्रज्ञान राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने शेंडा पार्कातील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे स्वॅब दिल्यानंतर अहवालाच्या प्रतीक्षेत चार-पाच दिवस असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, कोणत्याही मोबाईलवर हा संदेश मिळेल. या संदेशाखालीच त्या व्यक्तीच्या अहवालाची प्रत लिंकवर दिली जाणार आहे. या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर संबंधिताला आपल्या अहवालाची प्रिंटही काढता येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे स्वॅब दिलेल्या व्यक्तींबरोबरच त्याच्या कुटुंबीयांची होणारी घालमेलही थांबणार आहे.

Must Read

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण 26 मार्च रोजी सापडला. त्याच दरम्यान जिल्ह्यात स्वॅब तपासणीसाठी  (swab Test)शेंडा पार्कात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली. त्यानंतर आयसोलेशन आणि इचलकरंजीच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्येही (आयजीएम) प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. या तिन्हीही ठिकाणी तपासणी केलेल्या स्वॅबचे अहवाल मिळण्यात सुरूवातील प्रचंड अडचणी येत होत्या.


ग्रामीण भागातील व्यक्तीचे अहवाल त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जात होते, तेथून संबंधितांना ते कळेपर्यंत अनेक प्रश्‍न निर्माण व्हायचे. त्यातून रूग्ण, त्याचे नातेवाईक यांचा डॉक्‍टरांशी वाद हा ठरलेला होता. पुर्वी अहवाल सीपीआरमधील बोर्डवर चिकटवले जायचे; पण आपल्या नातेवाईकांचे नाव शोधताना लोकांना त्रास होत होता. यातून नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले.

कोरोनाचा(corona)जिल्ह्यात प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून स्वॅब देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा पत्ता, वय याबरोबरच त्यांचा मोबाईल क्रमांकही लिहून घेतला जात आहे. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना संबंधित विभागातील डॉक्‍टरांकडून त्याची माहिती दिली जायची.

ही माहितीही उशीरा पोहचत असल्याने तोपर्यंत संबंधितांचा अनेकांशी संपर्क व्हायचा. त्यातून समुह संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्व कटकटी बंद करण्यासाठी "क्‍लाईव्ह पॅथालॉजी' या कंपनीमार्फत हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. कालपासून हे तंत्रज्ञान कार्यान्वित झाले. यापुढे स्वॅब दिलेल्या संबंधितांना त्याचा अहवाल त्यांच्या मोबाईलवरच मिळणार आहे.