India corona casesIndia corona cases- देशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे. आताही गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 93,337 नवीन प्रकरण समोर आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 1,247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रोजच्या वाढत्या आकडेवारीमुळे देशात कोरोनाची एकूण आकडेवारी 53,08,015 इतकी आहे तर यामध्ये 10,13,964 इतके अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 42,08,432 रुग्णांनी कोरोनावर (corona)मात करत बरे झाले आहेत तर आतापर्यंत 85,619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरस थांबवण्याचं काही नाव घेत नाही. कोरोना विषाणूच्या संक्रमित रूग्णांचा आलेख वेगाने वाढत आहे. दररोज कोरोनाचे 90 हजाराहून अधिक केसेस समोर येत आहेत.


Advertise

विशेष म्हणजे कोरोनामुळे आतापर्यंत 43 लाख 8 हजार 431 लोक बरे झाले आहेत हीच दिलासाची बाब म्हणावी लागेल. आयसीएमआरच्या मते, गेल्या 24 तासात देशात 8,81,911 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 6,24,54,254 लोकांची कोरोना चाचणी केली गेली आहे.


Must Read

1) मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते झाले फिदा

2) संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

3) विनामास्क फिरणाऱ्यांवर बडगा, ११७२ जणांवर पोलिसांची कारवाई

4) पहिली प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला

5) ड्रग्ज प्रकरणात उर्मिला मातोंडकरांच्या अडचणी वाढल्या

दरम्यान, देशात (India corona cases)कोरोनाचा सर्वाधिक धोका हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ अजुनही कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात 21 हजार 656 नवे रुग्ण आढळून आले. तर 405 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 22 हजार 78 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली. नव्याने सापडलेल्या रुग्णापेक्षा बरे झालेले रुग्ण आज अधिक. बरे होण्याच्या रुग्णाची टक्केवारी 71. 47 टक्के एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची एकूणसंख्या 11 लाख 67 हजार 493 एवढी झाली आहे

कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार?

कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? याबाबत भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 2021 साल. हो पुढच्या वर्षीच कोरोनाच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू. 2021 सालच्या मध्यापर्यंत कोरोनाचं संकट कमी होईल, आपण सामान्य परिस्थितीत येऊ, अशी शक्यता एम्सच्या (AIIMS) कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली आहे. एएनआयने याबाबत ट्विट केलं.