corona-Action-on-the-shop-if-the-mask-is-not-used

corona
 कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा mask वापर करत नसलेल्याच्यावर कडक कारवाई करण्याबरोबरच मास्क न घालता आलेल्या ग्राहकास माल देऊ नये , तर दुकानदारांनी ही मास्कचा वापर न केल्यास संबंधित दुकानावर कारवाई करून , सदर दुकान सील करावे असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. माझे कुटुंब माझी जबाबदारी चा सर्वे योग्यपणे करावा अशी सूचनाही प्रशासनाला दिली.


जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी

Advertise

शासनाने By the government सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या पार्श्‍वभूमीवर शाहूवाडी तालुक्याचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता . याप्रसंगी मलकापूर नगर परिषदेत आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते . यावेळी प्रांताधिकारी अमित माळी ,तहसीलदार गुरु बिराजदार, नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, मुख्याधिकारी शीला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती त्याच बरोबर जास्तीत जास्त प्रमाणात शहरात होर्डिंग लावणं गरजेचं आहे. यासाठी शहरातील व्यापारी वर्गासह प्रायोजकांच्या वतीने शहरात जास्तीत जास्त जनजागृतीची होर्डींग्स उभी करावी , पालिकेच्या नगरसेवकांनीही पुढे येऊन जनजागृतीसाठी होर्डींग्स उभी करावेत , असे आवाहनही त्यांनी केले आहे.  

जास्तीत जास्त लोकांचा सर्वे करून तपासणी करून घेणे गरजेचे आहे यासाठी स्थानिक मंडळातील तरुण त्याचबरोबर पदाधिकारी, स्वयंसेवक यांना सुद्धा सक्रिय होणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मलकापूर नगरपरिषदेला प्रथमच भेट दिल्याबाबत नगराध्यक्ष अमोल केसरकर व उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मास्कचा वापर हा बंधनकारक असून मास्कचा वापर करत नसलेल्या यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.

शहरातील नागरिकांचा जास्तीत जास्त सर्वे करून अन्य आजाराची ही माहिती संकलित करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना अंमलात आणावी अशी सूचना प्रशासनाला दिली असून याबाबत त्वरित कारवाई करावी असा आदेश दिला आहे. प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार गुरु बिराजदार ,मुख्याधिकारी शीला पाटील ,यांनी तालुक्यासह शहरातील कोरोना बाबतची माहिती दिली. दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आंबा बांबवडे या ठिकाणी भेटी देऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाबाबत अधिक माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या यावेळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख मंडल अधिकारी विश्वास डोंगरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.