confusing-information-about-controversial-zilla-parishad-meetin

 जिल्हा परिषदेची सर्वसाधारणसभा 19 ऑगस्टला ऑनलाईन व पोलिस बंदोबस्तात घेण्यात आली. वास्तविक सभा ऑनलाईन घेण्याचे त्यावेळी कोणतेच आदेश नव्हते. या सभेची नोटीस वेळेत न मिळाल्याने ही सभाच बेकायदेशीर असल्याची बाजू उच्च न्यायालयात मांडली आहे. दरम्यान, ही सभा ऑनलाईन घेण्याचे पत्र जिल्हा परिषदेला 25 ऑगस्टला प्राप्त झाले. म्हणजेच सर्वसाधारणसभा झाल्यानंतर आलेले पत्र उच्च न्यायालयात सादर करून दिशाभूल करण्यात आली आहे. ही बाबदेखील न्यायालयाच्या निदर्शनास मंगळवारी (ता.29) होणाऱ्या सुनावणीत मांडली जाईल, अशी माहिती याचिकाकर्त्या, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी दिली. 

Advertise

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियिम 1961 नुसार सर्वसाधारणसभा घेण्यापूर्वी सदस्यांना 15 दिवस अगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे. ही नोटीस देताना विषयपत्रिकाही देणे आवश्‍यक आहे. सदस्यांना जी नोटीस देण्यात आली. त्या नोटीसवर 6 ऑगस्ट ही तारीख आहे. तर प्रत्यक्षात ही सभा 19 सप्टेंबरला झाली. त्यामुळे तारीख टाकल्यापासून सभा होईपर्यंतही 15 दिवसांचा कालावधी झाला नाही. तसेच नोटीसवर जरी 6 ऑगस्ट तारीख टाकली तर प्रत्यक्षात ही नोटीस 12 ते 14 या तारखेस पोष्टात टाकण्यात आली. त्यामुळे सभेपूर्वी काही दिवस ही नोटीस मिळाल्याने 19 ऑगस्टला झालेली सभा ही बेकायदेशीर आहे, असे याचिकाकर्ते सौ.मगदूम यांचे म्हणणे आहे, मात्र या सर्व प्रक्रियेत जिल्हा परिषदेने ऑनलाईन सभेचे जे पत्र जोडले आहे, त्याने संभ्रम निर्माण झाला असून, ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
.... 
आज न्यायालयात सुनावणी 
15 व्या वित्त आयोगाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सौ. मगदूम यांनी दाखल केली आहे, तर भाजपकडूनही एक याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी मंगळवारी (ता.28) होण्याची शक्‍यता आहे.