Main Featured

'आयजीएम’ ची विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी सहकार्य करा

IGM hospital


सीपीआरनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे रूग्णालय (hospital)म्हणून आयजीएमचा नावलौकिक  (IGM Hospital)आहे. या ठिकाणी दाखल होणार्‍या कोरोना रूग्णांना ऑक्सिजन(Oxygen), मोफत रेडिमीसिव्हीयर लस यासह अन्य वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 


यामुळे आयजीएमची बदनामी न करता सामान्य नागरिकांमध्ये विश्वासाहर्ता वाढवण्यासाठी गट, तट पक्षभेद बाजूला करून एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजूबाबा आवळे, नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजीव आवळे, जिल्हाशल्यचिकित्सक केम्पीपाटील उपस्थित होते.

Must Readपालकमंत्री पाटील म्हणाले, आयजीएम हॉस्पिटलसाठी सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन(Oxygen) टँक कार्यरत केला आहे. अजून त्याच क्षमतेचा आणखी एक टँक तेथे बसवला जाणार आहे. त्याचप्रमाणे सीटीस्कॅनची सोयही रूग्णालयात करण्यात येणार आहे. सध्या रूग्णालयात 200 बेड उपलब्ध आहेत, ते 300 पर्यंत नेण्याचेही नियोजन असून लवकरच याबाबत कार्यवाही होणार आहे.