Main Featured

कोल्हापूरात दिवसभर ढगाळ वातावरण, पावसाची भुरभुर


Paaus Kolhapur

जिल्ह्यात रविवारी दिवसभर आकाश दाटून आले होते, अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा जाणवत होता. गेली आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस रोज जोरदार हजेरी लावत आहे. शनिवारीही दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुवांदार पाऊस कोसळल. रविवारी रात्रभर जिल्ह्यात पावसाची भुरभुर होती. सकाळ पासून ढगाळ वातावरणासह अनेक तालुक्यात रिपरिप सुरू होती.दहा नंतर आकाश दाटून आल्याने जोरदार पाऊस कोसळणार असेच वाटत होते. 

मात्र दिवसभर तसेच वातावरण कायम राहिले. कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाची भुरभुर सुरू होती.पाऊस झाला नसला तरी हवेत गारठा मात्र जाणवत होता.रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ७.६७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात २०.५८ मिली मीटर झाला. धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्ग कायम आहे.


तालुकानिहाय पाऊस मिली मीटरमध्ये असा

 हातकणंगले २.२५, शिरोळ ३, पन्हाळा १३.७१, शाहूवाडी १०.५०, राधानगरी ६, गगनबावडा २०.५८, करवीर ५.९१. कागल ३, गडहिंग्लज २.५७, भुदरगड २.८०, आजरा ९.७५, चंदगड १२.दरम्यान, गगनबावडा ते भूईबावडा मार्गावर दरड कोसळल्याने एस. टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पन्हाळा ते केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक गायमुख मार्गे सुरू असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.

आठवडाभर पाऊस राहणार

जिल्ह्यात आगामी आठ दिवस पाऊस राहण्याचा अंंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये आज, सोमवार पासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

आगामी चार दिवस असे राहील हवामान-

वार         तापमान डिग्री     हवामान

  • सोमवार    २२ ते २६          मेघगर्जनेसह पाऊस
  • मंगळवार   २१ ते २६          मेघगर्जनेसह पाऊस
  • बुधवार       २२ ते २८         मेघगर्जनेसह पाऊस
  • गुरूवार        २२ ते २८        पाऊस