Main Featured

'हा' निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा

central governmentकेंद्र सरकारने (central government)कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरात पडसाद उमटले आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातबंदीवर नाराजी व्यक्त करत केंद्राला पत्र लिहिले आहे.
'केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे.' अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

Must Read
तसंच, 'बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने (central government)केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने (central government)या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे.
'आधीच लॉकडाउनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल आणि त्यांचे फार मोठे नुकसान होईल. याचा सहानुभुतीपूर्वक विचार करून आपण कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदारांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. 
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थात ही कांद्यावर अवलंबून आहे. तरी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय. अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय, या तीनही मंत्रालयांनी व्यापक हित लक्षात घ्यावे, अन्याथा अचानक केलेल्या निर्यात बंदीमुळे भारताच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो',  असा सल्लाही उदयनराजे यांनी केंद्र सरकाराला दिला आहे.


'कांद्या बाजार समितीत देणार नाही'

दरम्यान, केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर शेतकरी संतप्त झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. आता शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा न आणण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या अघोषित बहिष्कारामुळे आज नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामध्ये जेमतेम कांद्याची आवक झाली.