Main Featured

शरद पवारांनी दिला पियुष गोयल यांना सल्ला


central-government-employees-news-Sharad-Pawar-gave-advice-to-Piyush-Goyal

central government employees news निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या central government अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री  पियुष गोयल यांना आज करून दिली.

केंद्र सरकारने अचानकपणे सोमवारी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले आहे. शेतकऱ्यांनी केंद्राच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर  शरद पवारांनी कांदा निर्यात बंदीबाबत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री  पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीआधी त्यांनी ट्वीट करून आपली भूमिका मांडली.

केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी सोमवारी रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली. आज सकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली. बैठकीत प्रामुख्याने मुद्दा मांडला की कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे, अशी माहिती पवारांनी दिली.

'निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो', असं शरद पवारांनी गोयल यांना सांगितले.

'या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो.

या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदी #onionexportban बाबत फेरविचार करावा अशी विनंती पियुष गोयल यांना केली, असल्याचं शरद पवारांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव पाडला बंद
दरम्यान, मनमाडमध्ये शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. लासलगावला शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शिवा सुरसे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे  लासलगाव बाजार समितीत परिणाम दिसून आले आहे. कांद्याच्या भावात क्विंटल मागे  1000 रुपयांची घसरण झाली आहे. भाव कोसळल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आहे. त्यामुळे कांद्याचा लिलाव बंद पाडले आहे.

कांद्याचे कंटेनर थांबले
400 कंटेनर मुंबईच्या जेएनपिटी बंदरावर तर 80 कंटेनर चेन्नई पोर्टवर आहे. उभ्या एका कंटेनरमध्ये 29 क्विंटल कांदा असतो. 300 ट्रक कांदा घेऊन निघालेले ट्रक हे बांग्लादेशच्या सीमेवर उभे आहे.  भारतातून बांगलादेश,मलेशिया,दुबई, इंडोनेशिया यासह इतर देशात कांदा निर्यात केला जातो. त्यामुळे भारताने जर कांदा निर्यात बंदी केली तर निर्यात बंदीचा पाकिस्तानला फायदा होण्याची शक्यता आहे.