Main Featured

खूषखबर! फ्लॅट खरेदीवर आता लागणार नाही स्टॅम्प ड्युटी पण ....


                                    buy a flat No stamp duty
buy a flat 
आता ग्राहकांना फ्लॅट खरेदी करताना एक रुपयाचेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. एकीकडे राज्य सरकारने State government डिसेंबर २०२०पर्यंत राज्य सरकारने तीन टक्के शुल्कमाफी दिली आहे. त्यानंतर आता 'नरेडको' या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतील सदस्यांनी उर्वरित दोन टक्क्यांचा भारही स्वत:वर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ५० लाख रुपयांच्या फ्लॅटवर आणखी साधारण १ लाख रुपयांची बचत होणार आहे.


करोना coronavirusसंकटकाळात buy a flat  फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी व त्याचवेळी थंडबस्त्यात गेलेल्या स्थावर मालमत्ता उद्योगाला संजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क पाचवरून दोन टक्क्यांवर आणले आहे. या तीन टक्क्यांच्या सवलतीवर 'नरेडको'ने आणखी दोन टक्क्यांची सवलत देऊ केली आहे. यामुळे आता ग्राहकांनी 'नरेडको' च्या सदस्यांकडून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत फ्लॅट किंवा घर खरेदी त्यावर त्यांना एक रुपयादेखील मुद्रांक शुल्क लागणार नाही.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) ही देशभरातील निवासी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. या संघटनेच्या महाराष्ट्रातील (नरेडको पश्चिम) व्यावसायिकांनी मुद्रांक शुल्काबाबतचा निर्णय घेतला आहे. नरेडकोच्या महाराष्ट्र विभागात सुमारे ४५० व्यावसायिकांचा अर्थात बिल्डर्सचा समावेश आहे. सर्वाधिक व्यावसायिक मुंबई महानगर प्रदेशात आहेत. त्याखेरीज नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपुरातही सदस्य आहेत. या सर्व सदस्यांनी ग्राहकांना अशाप्रकारे मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली आहे.याबाबत नरेडको पश्चिमचे अध्यक्ष राजन बांदेलकर व अशोक मोहनानी यांनी सांगितले की, 'करोना संकटाचा सामना करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना आणखी दिलासा देण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे. ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा. मुद्रांक शुल्क १ रुपयादेखील भरावा न लागणार असल्याने भरपूर पैसा वाचणार आहे.'