Main Featured

Breaking- रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार

Riya chakraborty

रिया चक्रवर्ती (Riya chakraborty) अटकेसाठी तयार असल्याचे रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. आज (रविवारी) सकाळी रियाच्या घरी नोर्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई पोलिसांसह दाखल झाली होती. यावेळी एनसीबीनं तिला समन्स बजावलं आणि स्वतःहून चौकशीसाठी येण्याचा किंवा आत्ता पोलिसांसोबत येण्याचा पर्याय तिच्यासमोर ठेवला. त्यानंतर रियाने स्वतःहून चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर रियाच्या वकिलांनी ही माहिती दिली. दरम्यान, रिया एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे.

Must Read

रियाचे (Riya chakraborty) वकिल अॅड. मानेशिंदे म्हणाले,”जर हे प्रकरण जादूटोण्याचं असेल तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. प्रेम करणं हा गुन्हा असेल तर ती याचे सर्व परिणाम भोगायला तयार आहे. बिहार पोलिसांनी सीबीआय (CBI Enquiry), ईडी आणि एनसीबीच्या मदतीने दाखल केलेल्या खोट्या केसेसविरोधात  निरपराध असल्यानेच रियाने कुठल्याही कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केलेला नाही.”

रियाला सकाळी घरी जाऊन समन्स बजावल्यानंतर रिया एनसीबी समोर चौकशीसाठी हजर होण्याकरिता घरातून आपल्या कारने बाहेर पडली. त्यानंतर अॅड. मानेशिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मानेशिंदे यांच्या विधानावरुन रियाला चौकशीदरम्यान अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

“रिया इथे चौकशीसाठी येणार आहे. या ठिकाणी तिच्याकडे केवळ चौकशी केली जाणार आहे. यानंतर जे काही समोर येईल त्याची माहिती माध्यमांना दिली जाईल.”