Main Featured

Breaking news : रिया चक्रवर्ती ला झाली अटक :हॊणार वैद्यकीय चाचणी


                                     Riya Chakraborty arrested by NCB

अभिनेता सुशांतसिंह राजपूत  (sushant singh rajput ) मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. रियाची वैद्यकीय चाचणी प्रथम केली जाईल, असे सांगितले जात आहे. सलग तिसर्‍या दिवशी एनसीबीने रियाची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली.

 सुशांतसिंह(Riya Chakraborty arrested) राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव पुढे आले. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात तिचे घेतले गेले होते. तिचा ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने रियाला  एनसीबीने ताब्यात घेतले होेते. रियाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे एनसीबीने रियाला अटक केली आहे. रियाला मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे वाचून तर बघा....