Main Featured

तुमचा सगळा डेटा bluetooth मधून हॅकरपर्यंत पोहोचतो


new-hacking-technology-attacker-access-bluetooth

डिव्हाइसबाबतीत बोलायचं झालं तर आजकल ब्ल्यूटूथ (Bluetooth) एक आवश्यक भाग झाला आहे. वायरलेस (wireless) कनेक्ट केलेलं हे डिव्हाइस डेडा ट्रान्सफर करण्यासाठीही मदत करतं. पण CNETच्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखो ब्ल्यूटूथ स्पोर्टेड डिव्हाइस धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. या अहवालामध्ये BLURtooth विषयी चर्चा करण्यात आली आहे, ज्यामुळे डिव्हाइसला हॅक करण्यासाठी मोठा फायदा होत आहे.

यामुळे, हॅकर्स दोन ब्ल्यूटूथ डिव्हाइसमधली सिक्युरिटी हॅक करू शकतात. असं केल्यामुळे तो आपल्या अवतीभोवती ब्लूटूथ डिव्हाइसला कनेक्ट होतो आणि यातून आपली महत्त्वाची माहिती लीक होण्याची शक्यता आहे. हा समस्येची नोंद Cross-Transport Key Derivation (CTKD) द्वारे करण्यात आली असून आणि दोन उपकरणांमधील ऑथेंटिकेशन-key सेटअप करताना हा प्रॉब्र्लेम झाला असावा.

डिव्‍हाइसेस ऑथेंटिकेशन-keyच्या मदतीने डिव्हाइस कोणत्या ब्लूटूथशी कनेक्ट करायचं आहेत ते ठरवलं जाऊ शकतं. तर BLURtooth सोबत हॅकर्स संधीचा फायदा घेतात आणि CTKD ला कंट्रोल करतात. यानंतर, हॅकर्स ऑथेंटिकेशन-key पुन्हा ओव्हरराईट करून दोन डिव्हाइसमधील इनक्रिप्शन कमी करू शकतात.

यानंतर, ब्लूटूथच्या मदतीने टार्गेट केलेल्या डिव्हाइसवर डेटा पाठविला जाऊ शकतो आणि दोन डिव्हाइसमधला डेटाही वापरला जाऊ शकतो. याचा मोठा परिणाम असा की, ब्लूटूथ 4.0 और ब्लूटूथ 5.0 चा वापर करणाऱ्या डिव्‍हाइसेसला याचा मोठा धोका आहे.