Main Featured

गांजाचे ओडिसा, आंध्रचे कनेक्‍शन


  

connection-odisha-andhraगांजाचे ओडिशा, आंध्र प्रदेश, सीमाभागापर्यंतचे कनेक्‍शन यापूर्वीच पोलिसांनी शोधून काढले. जिल्ह्यातून गांजा हद्दपार करण्यासाठी मुळापर्यंत जाऊन थेट म्होरक्‍याच्या मुसक्‍या आवळण्याची गरज आहे. 

शहरात चार महिन्यांत हाणामाऱ्यांचे प्रकार वाढले होते. गांजा (Hemp सेवनातून ही गुन्हेगारी वाढत असल्याच्या तक्रारी येऊन लागल्या. गांजासह अमली पदार्थाची तस्करी विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश वरिष्ठांकडून सहा महिन्यांपूर्वी दिले. तसा अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा वेग वाढला. लॉकडाउन लागू असताना जूनमध्ये राजारामपुरी पोलिसांनी शेंडा पार्क येथे दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 20 किलो गांजा जप्त केला. त्याचे कनेक्‍शन शोधून काढण्यास सुरवात केली. यात गांजाचे विटा, पंढरपूर, सोलापूर, ओडिसा, आंध्र असे कनेक्‍शन पुढे आले. हा गांजा तीन टप्प्यात कोल्हापुरात येतो. मूळ आठ, नऊ हजारांच्या गांजाची रक्कम शहर, जिल्ह्यात 30 ते 35 हजार कशी होते, हे राजारामपुरी पोलिसांनी शोधून काढले. संपूर्ण कारवाईत एक दोन नव्हे तर 40 किलोपर्यंतचा गांजा जप्त करण्याची कारवाई केली. 

Advertise

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

मिरजमार्गे येणाऱ्या गांजाला चाप हवा 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गांजाची कारवाई होते. ती एजंटापर्यंत मर्यादित असते. गांजा ओढणारा अगर गांजा विक्री करणारा जर कोणी सापडला तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. तरच यामागचा सूत्रधार म्होरक्‍यापर्यंत पोहचता येईल. फिल्मीस्टाईल पाठलाग करून मोटारीतील दोन किलो गांजा नुकताच जुना राजवाडा पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर याचे कनेक्‍शन शोधण्याचे कामही त्यांनी युद्धपातळीवर सुरू केले. अशाच पद्धतीने गांजासह अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून परप्रांतातून मिरजमार्गे जिल्ह्यात येणाऱ्या गांजाला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.