Main Featured

"या" नेत्याला रोहित पवारांनी खडसावले


                                       rohit pawar

महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बिहारमधील(Demand for Presidential Rule) लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलंच खडसावलं आहे. रोहित पवारांनी पत्र लिहून बिहारमधील गुन्हेगारीची आकडेवारीचं वाचून दाखवली आहे. एक ट्विट करुन रोहित पवारांनी पासवान यांना बिहारमधील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण दाखवत आकडेवारीसह वास्तव मांडलं.

रोहित पवारां (Rohit Pawar) नी आपल्या पत्रात लिहिलं की, चिरागजी आपण महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तुम्ही चिंतातूर आहात आणि राज्यात राष्ट्रपती राजवटीचीही मागणी केली असं ऐकलं. आता तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेची इतकीच चिंता आहे, तर मग बिहारमध्येही तुम्ही अशी मागणी का केली नाही? जेव्हा मुजफ्फरपूर निवारागृहामध्ये मुलींचं लैंगिक शोषण (maharashtra politics)करण्यात आलं होतं. अशा घटना इतरही जिल्ह्यांमध्ये घडल्याचं तुम्ही म्हटलं होतं तेव्हा मात्र आपण नितीश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली नाही', असं लिहित बिहारची राजधानी पाटणा ही देशातील खुनांच्या घटनांमध्ये १९ शहरांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याची धक्कादायक बाब त्यांनी अधोरेखित केली.

Must Read


 

सुशांतसिंहच्या मृत्यूचा वापर करून स्वत:चं राजकीय करिअर करू पाहणाऱ्या अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात बोलणं सोपं आहे, पण बिहारच्या मूलभूत समस्यांची जबाबदारी घेऊन तिथं सुधारणा करणं कठीण असल्याचा टोलाही रोहित पवारांनी हाणला आहे.

बिहारची राजधानी पाटणा खुनांच्या गुन्ह्याच्या बाबतीत(Demand for Presidential Rule) देशातील १९ मोठ्या शहरांमध्ये अव्वल आहे. हुंडाबळीच्या गुन्ह्यातील पाटणा पहिल्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये राजेंद्र सिंह यांच्यासारख्या पाच आरटीआय कार्यकर्त्यांचा दिवसाढवळ्या खून झाला. अनेक पत्रकारांचे खून झाले. भूमाफियांकडून लोकांना मारणं, घरं जाळण्यासारख्या घटना बिहारमध्ये अगदीच किरकोळ झाल्या आहेत. १५ वर्षांत अर्ध्या डझनाहून अधिक अधिकाऱ्यांचे खून झालेत. मग सामान्य जनतेचे काय हाल होत असतील याची कल्पना करता येऊ शकते. हे सगळं घडत असतानाही तुमचा पक्ष सत्ताधारी आघाडीमध्ये सहभागी कसा?,' याबद्दल रोहित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.