Muddy water in tap

इचलकरंजी शहरातील काही भागात नळाला अतिशय गढुळ काळेकुट्ट तर काही भागात मैलामिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांतून पाणीपुरवठा विभागाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

इचलकरंजी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी शहराला दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले. त्यामुळे शहरवासियातून त्यांचे कौतुक होऊ लागले. त्यावेळी वारणा नाही आली तरी चालेल पण सभापती हाच पाहिजे अशा प्रकारच्या भावनासुध्दा नागरिकांतून व्यक्त होऊ लागल्या होत्या. हे काही दिवस चालल्यानंतर पाणी पुरवठ्याची परिस्थिती पुन्हा ये रे माझ्या मागल्या...प्रमाणे झाली. चार दिवसापासून ते दहा दिवसाआड पाणी मिळू लागल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागला. त्यातच आता नळाला काळेकुट्ट गढुळ  तसेच मैलामिश्रीत पाणी येऊ लागल्याने संतापात भरच पडली आहे.

Advertise

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्षच केले जात आहे. पाणी पुरवठा सभापतींकडून नागरिकांची पाण्यासाठी वणवण थांबावी म्हणून प्रयत्न केले जात असले तरी या विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष करुन लिकेज दाखवून ढपला पाडण्यात धन्यता मानली जात आहे. अर्थपूर्ण व्यवहारात पारंगत या कर्मचार्‍यांमुळे कार्यक्षम सभापतींसह नागरिकांनाही पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण ही शहरवासियांच्या पाचवीला पुजली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.