Main Featured

‘पबजी’चा खेळ खल्लास; पालक समाधानी


                                  PUBG


 सतत त्या मोबाईलमध्ये डोकावून असायचा. अभ्यास कर म्हणलं की पाच मिनिटे थांब करत करत पबजी खेळण्यात तासन्‌तास वाया घालवायचा. कार्तिकचे बाबा इथे नसतात, त्यामुळे मलाच मुलांचे शैक्षणिक प्रश्न सोडवावे लागतात. (‘Pubji’ game stoped; parents satisfied)त्यात मुलगा अभ्यासाच्या वेळीसुद्धा या मोबाईलमध्येच मग्न. काय तर म्हणे मित्रांसोबत पबजी खेळतोय. पण आता मात्र या पबजी नावाचं ग्रहण संपलं. निदान आता तरी कार्तिक मोबाईलमधून डोकं बाहेर काढेल, अशी प्रतिक्रिया अकरावीत असलेल्या कार्तिकची आई रूपाली मोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. रूपाली या ४२ वर्षीय गृहिणी आपल्या दोन मुलांसोबत राहतात. त्यांचे पती हे कामानिमित्त बाहेरगावी असतात. 

भारत-चीन सीमावादचा मुद्दा अद्याप सुरूच असून केंद्र सरकारने चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ केला. याच अनुषंगाने देशात बुधवारी चीनच्या आणखी ११८ ॲपवर बंदी घातली. यामध्ये गेमिंग ॲप पबजीचाही समावेश आहे. पबजीवर बंदी घातल्याने युवक वर्ग जरी नाराज झाला असला तरी पालकांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे. तर एक गेमिंग ॲप बंद झाल्याने तरुणाई इतर पर्यायी ॲपकडे वळतील. मात्र पबजीमुळे मुलं खूप वेळ मोबाईलवर घालवत असल्याची पालकांची तक्रार आता कमी होईल, अशी आशा मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मोबाईल गेमिंगमुळे युवकांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. लॉकडाउनच्या काळात पबजी सारख्या गेमिंग ॲपमध्ये युवक वर्ग सर्वाधिक (‘Pubji’ game stoped; parents satisfied) व्यस्त होता. पबजी बॅन केल्याने पालकवर्ग खूश जरी असला तरी, गेमिंग ॲपचे पर्याय मुले शोधू शकतात.

- श्रीकांत पवार, विभाग प्रमुख मनोविकृती सामाजिक कार्य, मानसिक आरोग्य संस्था.

Must Read

1) राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

2) 19 वर्षीय कोरोना संक्रमित तरुणीवर रुग्णवाहिकेतच बलात्कार

3) बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्सचं सेवन

4) खुद्द अजित पवारांनी केला मोठा खुलासा

5) पुढचे तीन महिने कोरोनाचं आव्हान

पालकांनी सर्वात प्रथम मुलांसोबत संवाद वाढवावा. त्यांना घरातील व मैदानी खेळांचे महत्व पटवून द्यावे. त्यामुळे मोबाईल गेमिंगमधून ते बाहेर पडतील व ’स्क्रीनींग टाईम’ कमी होईल. मात्र इतर पर्यायांकडे मुलांचे लक्ष वळणार नाही यासाठी पालकांनी प्रयत्न करावा.

- डॉ. कृष्णा कदम, वरिष्ठ मनोविकृतीशास्त्रतज्ञ, ससून रुग्णालय

माझा २३  (‘Pubji’ game stoped; parents satisfied)वर्षांचा मुलगा नेहमी पबजी खेळत होता. सध्या किमान रोज चार तास तो मोबाईलवर गेम खेळतो. लॉकडाउनमुळे सध्या कॉलेज सुरू नाही. तो एका ठिकाणी कामाला जात होता. तेही बंद झाले होते. त्यामुळे वेळच वेळ होता. मात्र पबजी बंद झाल्यापासून तो आता जरा घरात मिसळला आहे.

- रामदास कुऱ्हाडे, पालक