Main Featured

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट


politics-news-sharad-pawar-met-cm-uddhav-thackeray

politics news
 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांच्यात चर्चा झाली. मराठा आरक्षण आणि कंगना रणौतच्या विषयावर त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली.

अभिनेत्री कंगना रणौतच्या Kangana Ranaut कार्यालयावर बुधवारी मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांनी या प्रकरणी पहिल्यांदा भाष्य केलं होतं. पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं होतं. “कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची Of officers नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल,” असं ते म्हणाले होते.

दरम्यान, कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही.” “महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये.” असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.