Main Featured

सुशांतची आत्महत्या की हत्या? मिळाला अंतिम रिपोर्ट



दिल्लीच्या एम्स रुग्णालयाकडून बॉलिवूड (bollywood)अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमचा अभ्यास पूर्ण झाला असून त्यांनी सीबीआयकडे (CBI)सोपवला असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.


“एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. सोमवारी यासंबंधी सविस्तर बैठक पार पडली”. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि गेल्या ४० दिवसांत सीबीआय तपासात आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.

Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो

सुशांत सिंहचा (sushant singh rajput)१४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय (CBI) याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात सुशांत सिंहच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी ट्विट करत सीबीआय तपास होत असलेल्या दिरंगाईमुळे नाराज असल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी एम्सच्या डॉक्टरांनी मी पाठवलेले फोटो पाहिल्यानंतर फार आधीच ही २०० टक्के हत्या असून आत्महत्या नसल्याचं सांगितलं होतं असा दावाही त्यांनी ट्विटमध्ये केला होता.  विकास सिंह यांच्या दाव्यावर बोलताना डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी समितीच निर्णय पुराव्यांवर आधारित स्पष्ट आणि अंतिम असेल असं सांगितलं होतं. फक्त फोटो पाहून कोणतंहीत अंतिम मत व्यक्त केलं जाऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

याआधी एम्स डॉक्टर २२ सप्टेंबरला सुशांत प्रकरणी अंतिम अहवाल सादर करत ही हत्या आहे की आत्महत्या स्पष्ट करणार होते. पण नंतर ही तारीख पुढे ढकलण्यात आली. याचवेळी विकास सिंह यांनी सीबीआय तपास होत असलेली दिरंगाई निराशाजनक असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर सीबीआय तपासाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे.