Main Featured

“बॉलिवूडमधल्या ड्रग्ज माफियांची नावं उघड कर” कंगनाला आव्हान

bollywood  kangana  ranaut

Entertainment News- कंगना रणौतने बॉलिवूडमधल्या ड्रग्ज माफियांची नावं उघड करावीत आणि संपूर्ण इंडस्ट्रीवर उपकार करावेत, असं आव्हान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी दिलं. कंगनाने ड्रग्सविषयी इतकी वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे संपूर्ण देशालासुद्धा त्या ड्रग्स माफियांची नावं जाणून घ्यायची आहेत, असंही त्या म्हणाल्या. कंगनाचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य, तिला देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा, ड्रग्सवरून तिने बॉलिवूडवर (bollywood)केलेली टीका यावरून उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला.


उर्मिला मातोंडकर (urmila matondkar)म्हणाल्या, “कुठे आहेत ती नावं? कंगनाने समोर येऊन ती नावं सांगावित आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीवर उपकार करावेत. सर्वच गोष्टी बाहेर येऊदेत. तिने नावं जाहीर केल्यास मी सर्वांत आधी तिला पाठिंबा देईन. सतत दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा तिने एकदाची नावं सांगून टाकावीत.” संपूर्ण इंडस्ट्रीला (bollywood)ड्रग माफिया म्हणत बदनाम करणं चुकीचं असल्याचं मतंही त्यांनी मांडलं.

Must Read


उर्मिला मातोंडकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमध्ये कंगनावर (kangana ranaut)निशाणा साधला. कंगनाच्या वक्तव्यांचा विरोध करत त्यांनी तिला ड्रग्स माफियांची नावं उघड करण्याचं खुलं आव्हान दिलं. आता कंगना या आव्हानाला काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.