Shreyas-Iyer-gets-punishment

पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला Shreyas Iyerla शिक्षाही मिळाली आहे. अय्यरला स्लो ओव्हर रेट अंतर्गत 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीला परभवाचा पहिला झटका बसला. हैदराबादनं दिल्लीचा 15 धावांनी पराभव केला.

याआधी दिल्लीनं सलग दोन सामने जिंकले आहेत. पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला शिक्षाही मिळाली आहे. अय्यरला स्लो ओव्हर रेट अंतर्गत 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. या हंगामातील श्रेयस अय्यर दंड ठोठावण्यात आलेल्या दुसरा कर्णधार आहे. याआधी विराट कोहलीलाही दंड भरावा लागला होता. 

Advertise

आयपीएल प्रेस रिलीजनंतर आयपीएल कोड ऑप कंडक्टनुसार श्रेयसला स्लो ओव्हर रेट प्रकरणी शिक्षा देण्यात आली आहे. अय्यरला आता 12 लाखांचा दंड भरावा लागेल. दिल्ली कॅपिटल्स संघाला स्लो ओव्हर रेटचा बसलेला हा पहिला फटका आहे. तर आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.