Main Featured

पायल घोषने राज्यपाल कोश्यारींची घेतली भेट, जीवाला धोका असल्याचं सांगत केली 'ही' मागणी


 

payal-ghosh-met-maharashtra-governor-bhagat-singh-koshyar

आज मंगळवार रोजी बॉलीवूड अभिनेत्री पायल घोष (Payal Ghoshने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari यांची भेट घेतली. पायलने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणाशी संबंधित गोष्टींसाठी पायलने महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत तिने कोश्यारींसमोर तिची बाजु मांडली.

भगतसिंह कोश्यारी यांच्याची भेट घेतल्यानंतर पायलने मिडियासोबत देखील बातचीत केली. मिडियासोबत केलेल्या बातचीतमध्ये पायलने सांगितलं की, 'महाराष्ट्राच्या राज्यपालांसमोर तिने तिच्या गोष्टी मांडल्या आहेत आणि रेकॉर्ड म्हणून एक तक्रार पत्र देखील त्यांना दिलं आहे. आम्ही त्यांच्याकडे Y सुरक्षेची मागणी केली आहे आणि त्यांनी खूप चांगल्याप्रकारे आम्हाला सहकार्य केलं. आम्हाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.'Must Read

1) शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

2) आता चीनवर असणार भारताचा 'तिसरा डोळा', अमेरिकेकडून खरेदी करणार ...

3) 'पुढच्या 5 मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवून टाकू

4) UC Browser ला मिळाला स्वदेशी पर्याय लाखो युझर्सनं केलं डाउनलोड

5) ईशा गुप्ताने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टनिंग फोटो


पायलला जेव्हा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का असं विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'या सगळ्याविषयी माझे वकिल तुमच्याशी बोलतील. मी कायदेशीर गोष्टींबाबत काही बोलू शकत नाही. राज्यपाल यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते म्हणाले की मी माझ्यापरिने तुम्हाला जी मदत शक्य होईल ती करेन.'


पायल घोषने राज्यपाल कोश्यारींसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राज्यपाल यांच्यासोबतंच राज्यसभा खासदार रामदास आठवले देखील दिसून येत आहेत. सोशल मिडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पायलने नुकतंच रामदास आठवले  (Ramdas Athawale) यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात सुरक्षेची मागणी करण्यासाठी पायलने आज कोश्यारींची आठवलेंसोबत भेट घेतली.