Main Featured

मुंबईत दाखल होताच कंगनाला करणार होम क्वारंटाईन?


                                  kangna ranaut homequritine


अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयावर (Kangana will be home quarantined)अचानक धाड टाकली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यात आली. याठिकाणी अनधिकृत बांधकाम आढळल्यास पालिकेकडून तात्काळ पाडकाम केले जाण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे ९ सप्टेंबरला कंगना राणौत मुंबईत येणार आहे. मी मुंबईत आल्यानंतर मला रोखून दाखवा, असे जाहीर आव्हान कंगनाने शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे ९ तारखेला काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिका कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन करण्याच्या तयारीत आहे. याबद्दल पालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. 

Must Read

1) प्रख्यात मराठी लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे कालवश

2) प्रतीक्षा संपली! याच आठवड्यात मिळणार कोरोनाची लस, रशियानं केलं जाहीर

3) मद्यधुंद निवृत्त पोलीस निरीक्षकाने सहा जणांना उडवले, एकाचा मृत्यू

4) CSK नंतर आता 'या' संघाला कोरोनाचा धोका, मुख्य सदस्य निघाला पॉझिटिव्ह

5) काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र

परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे कंगनाच्या हातावरही विमानतळावर उतरल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल. येत्या दोन दिवसांत ICMRकडून(Kangana will be home quarantined) क्वारंटाईन संदर्भात नवे नियम आल्यास त्यानुसार क्वारंटाईनची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे यावर आता कंगना राणौत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

यापूर्वी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारमधील पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना पालिकेने क्वारंटाईने केले होते. यावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये मोठा वादही रंगला होता. यापाठोपाठ आता शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या कंगनालाही होम क्वारंटाईन केल्यास, काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.