Main Featured

आधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले डगाव बुद्रूक परिसरातील कोविड तपासणी केंद्रात  (Kovid Inspection Center) आमची तपासणी अगोदर करा, नाहीतर कोणाचीही तपासणी होउ देणार नाही. असे म्हणत दादागिरी करणाऱ्या तरुण तरुणीने केंद्रातील कोरोना रुग्णांचे स्वॅब (Swab) फेकून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवानी श्रीकांत उगले आणि प्रीतम संजय बोंद्रे (रा. आंबेगाव बुद्रूक ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन राजगुरु (वय 45, रा. इंदिरानगर ) यांनी फिर्याद दिली आहे.

Must Read

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव बुद्रूक परिसरात नागरिकांसाठी मोफत कोविड तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी काल रांगेत नागरिकांची तपासणी (nasopharyngeal swab)करण्यात येत होती. त्यावेळी तेथे आलेल्या शिवानी आणि प्रीतमने डॉक्टरांना आमची कोविड तपासणी अगोदर करा, अन्यथा कोणाचीही तपासणी करुन देणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे डॉक्टरांनी दोघांनाही रांगेतून येण्याचा सल्ला दिला. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी कोविड (nasopharyngeal swab) केंद्रातील रुग्णाचे स्वॅब फेकून दिले. आरडा-ओरडा करीत परिसरात गोंधळ घातला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत आहेत.