Main Featured

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक


                                    daya naik and uddhav thakre


एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक ( Daya Nayak) यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांनाही धमकीचा फोन गेला होता. त्यानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी जुहू एटीएस युनिट आज 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहे.


उद्धव ठाकरे, (Man arrested for threatening Uddhav Thackeray)शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका अज्ञात नंबरहून धमकीचे फोन आले होते. देशमुख यांनी कंगना राणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले असल्याचं मह्टलं होतं. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्ष यंत्रणा करत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा करत होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. 

Must Read

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबईवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती पुढे आली होती.

ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावत त्यांना कोलकाताहून ताब्यात (Man arrested for threatening Uddhav Thackeray)घेण्यात आलं आहे. या आरोपींची चौकशी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री 11च्या सुमारास 4 फोन कॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आॉपरेटरने घेतले होते. त्यानंतर मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढिण्यात आली होती.