Main Featured

ड्रग्सचा वापर जीवनातील दु:ख दूर करण्यासाठी

drugs addicts

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी ड्रग्स
(drugs addicts)चॅट समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटींना ट्रोल केले जात आहे. तसेच अनेक कलाकारांनी यावर वक्तव्य करत मत मांडले आहे. अशातच अभिनेत्री पूजा भट्टने केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे.

नुकताच पूजाने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने कोणी अशा लोकांची काळजी करतात का जे जीवन संपवण्याच्या मार्गावर असतात, जे ड्रग्सचा (drugs addicts)वापर करुन जीवनातील दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करतात? 
जे लोकं स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण न झाल्यामुळे अस्वस्थ होतात आणि खचून जातात. त्यात गरीबी आणि आयुष्यातील गोंधळामुळे ते अशा पदार्थाचे सेवन करतात? पण अशा लोकांना सुधारण्यासाठी कोणी काळजी करतं का ? या आशयाचे ट्विट पूजाने केले आहे.
पूजाने यापूर्वी देखील बॉलिवूड कलाकरांना ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. तिने हंसल मेहता यांना उत्तर देत कोणीही छोटा अभिनेता नसतो असे म्हटले होते. लोकं मुद्दाम कलाकारांसाठी असे शब्द वापरत आहेत, ‘वर्क आउट’ अभिनेता, बी किंवा सी ग्रेड अभिनेता असे म्हटले होते.
काही दिवसांपूर्वीच पूजा भट्टचा ‘सडक २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच यूट्यूबवर पहिल्या चोविस तासात सर्वाधिक डिसलाइक मिळालेला हा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.