Main Featured

सांगलीत करोनाबाधित मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार


corona-virus-vaccine-sangli-news-covid-patients-dead

corona virus vaccine 
सांगलीतील हरिपूर रोडवरील स्मशानभूमीत करोनाबाधित coronavirus मृतदेह दफन करून परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर दफन केलेला मृतदेह बाहेर काढून महापालिका प्रशासनाने गुरुवारी मिरज-पंढरपूर रोडवरील महापालिकेच्या कोव्हिड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. या प्रकाराने हरिपूर रोडवरील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सांगली, मिरज, कुपवाड महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील एका व्यक्तीचा बुधवारी करोना संसर्गामुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह महापालिका प्रशासनाकडे सोपवण्याऐवजी परस्पर हरिपूर रोडवरील स्मशानभूमीत आणला. तेथेच अंत्यसंस्कार Funeral करण्यात आले. वास्तविक करोनाबाधित मृतदेहांवर महापालिकेच्या मिरज-पंढरपूर रोडवरील कोव्हिड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, नातेवाईकांनी याबाबत महापालिका प्रशासनाला काहीच कळवले नाही. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी यावर आक्षेप घेऊन महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या. याची माहिती मिळताच सांगली पोलिस आणि महापालिकेचे Municipal Corporation कर्मचारी तातडीने दाखल झाले. पीपीए किट परिधान करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दफन केलेला मृतदेह जेसीबीच्या मदतीने पुन्हा बाहेर काढून तो कोव्हिड स्मशानभूमीकडे पाठवला.