Main Featured

काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान


                             काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान


शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, (Mumbai is the father of a Marathi man) आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे तुम्हाला माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे खुले आव्हानच कंगनाने शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लोकांचा आहे. मी निक्षून सांगते की, मी मराठा आहे. माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे कंगनाने म्हटले आहे. 

Must Read


कंगनाने शुक्रवारी (Mumbai is the father of a Marathi man)सकाळीही ट्विट करून शिवसेनेला डिवचले होते. अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे कंगना राणौतने म्हटले होते. 

कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी शिवसेना भवनासमोर कंगना महिला शिवसैनिकांनी कंगना राणौतचा पुतळा जाळून तिचा निषेध केला. तसेच येत्या ९ तारखेला कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.