Main Featured

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार अमेरिकन क्रिकेटपटू


live-ipl-american-cricketer-will-play-ipl-first-time

live ipl कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमिअर लीग आयपीएल ipl स्पर्धेचा तेरावा हंगाम या महिन्याच्या 19 तारखेपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरु होणार आहे. त्यामुळे आयपीएल मधील सर्व संघ काही दिवसांपूर्वीच अमिरातीत दाखल झाले आहेत. दिनेश कार्तिकच्या Dinesh Karthik नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ देखील अमिरातीत दाखल झाला असून, यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. आता यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी फ्रँचायझीने आता 29 वर्षीय अमेरिकन वेगवान गोलंदाज अली खानला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. त्यामुळे अली खान हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणारा पहिला अमेरिकन क्रिकेटपटू असेल.    

कोलकाता नाईट रायडर्सच्या Kolkata Knight Riders संघातील वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हा दुखापतग्रस्त झाल्यामुळे केकेआरने अली खानचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. यामुळे   अली खान आता हॅरी गर्नीची जागा घेणार आहे. हॅरी गर्नी खांद्याच्या दुखापतीमुळे पीडित असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ज्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. अली खान हा वेस्ट इंडिजमध्ये नुकताच संपलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मधील ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा सदस्य होता. तर यावर्षीच्या सीपीएलचे विजेतेपद ट्रिनबागो नाइट रायडर्सच्या संघाने जिंकले.

अली खानने सीपीएल स्पर्धेत आठ सामने खेळले असून, त्यामध्ये त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. तसेच यावेळेस त्याची सरासरी 7.43 होती. केकेआरला अली खानला मागील वर्षीच आपल्या संघात सामील करायचे होते. मात्र त्यावेळेस कोणताही करार होऊ शकला नाही. याशिवाय सीपीएलमध्ये अली खानची एन्ट्री ड्वेन ब्राव्होमुळे झाली होती आणि त्याने लीगच्या पहिल्याच चेंडूवर कुमार संगकाराची विकेट घेतली होती. तर, अली खान यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग आणि बांगलादेश प्रमियर लीगमध्येही खेळलेला आहे.