Main Featured

बॉलिवूड अभिनेत्री ड्रग्ज का घेतात? राखी सावंतनं केला खळबळजनक खुलासा


 

rakhi-sawant-bollywood-drugs-investigationअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणा (Actor Sushant Singh Rajput death caseच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री राखी सावंत हिने प्रतिक्रिया दिली. बॉलिवूड अभिनेत्री आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रग्जचं सेवन करतात असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

Advertise

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

 राखीने  (rakhi sawant) ड्रग्स प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “मी गेली १५ वर्ष बॉलिवूडमध्ये काम करतेय. मी पाहलंय की अनेक अभिनेत्री वजन वाढू नये म्हणून ड्रग्जचं सेवन करतात. मला देखील काही वर्षांपूर्वी ड्रग्ज घेण्याचा सल्ला कोणीतरी दिला होता. असं म्हणतात की ड्रग्ज घेतल्यानं भूक लागत नाही. त्यामुळे वजणावर नियंत्रण राखलं जातं. पण मी स्लीम शरीरयष्टीसाठी ड्रग्ज ऐवजी हॉट योगाचा पर्याय स्विकारला. मी व्यायाम आणि योग करुन माझं वजन नियंत्रणात ठेवते.”

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.