Main Featured

भारतात कोरोनाची येणार दुसरी लाट

corona second wave in india


भारतात (India)सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची (corona)साथ पसरली आहे. भारतात दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत असून जवळपास लाखभर रुग्ण रोज सापडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याबद्दल इशारा दिला असून भारतात दररोज वाढणाऱ्या रुग्णांमुळे चिंता वाढत आहे. 


मात्र दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये एकदा कमी होते असं वाटत असताना पुन्हा एकदा साथीने उफाळून डोकं वर काढलं आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्यामुळे ही दुसरी लाट असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे पहिली लाट येऊन गेली का? पहिली लाट कधी संपली? दुसरी लाट खरोखरच आली आहे का आणि ती किती टिकणार याविषयी तज्ज्ञांशी बोलून समोर आलेली माहिती..


Must Read


देशातील काही भागात करोना संसर्गाची दुसरी लाट आहे, असं Covid-19 राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य आणि दिल्लीच्या AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. डॉ. गुलिरिया एक आघाडीचे फुफ्फुसशास्त्रज्ञसुद्धा आहेत.

कोरोनाची (corona)लाट म्हणजे नेमकं काय हेच अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एका व्याख्येनुसार लाट म्हणजे आजारी व्यक्तींची निश्चित वाढती संख्या आणि त्यानंतर हळूहळू संख्येत झालेली घट. मग भारतात असं झालं का? तर  काही ठिकाणी असे झालं. संपूर्ण देशभरात Coronavirus ने एकसारखं वर्तन केलेलं नाही. काही शहरांमध्ये ही साथ फोफावली आहे, तर काही भागात अद्याप तेवढा धोका निर्माण झालेला नाही. 

डॉ. गुलेरिया यांनी भारतात दुसरी लाट म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न केला. “काही भागात कोविड -19 च्या धोक्यामुळे लादलेल्या बंधनांना लोक कंटाळले. मृत्यूदर कमी आहे, त्यामुळे थोडी भीती कमी झाली आणि दिल्लीसारख्या शहरात सगळी बंधनं, नियम झुगारून लोक आता मास्कशिवाय फिरत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. लोकांच्या अशा निष्काळजीपणामुळे येत्या काळात करोना रुग्णाच्या संख्येत वाढ होईल", असंही गुलेरीया म्हणाले.

याबाबत अधिक बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, "येत्या काही महिन्यांमध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. जरी आपण हे वाढते आकडे पाहणार असलो तरी, प्रति दहा लाख प्रकरणांमध्ये रुग्णसंख्या इतर देशांच्या मानाने कमीच होत जाईल."

जूनमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Saumya Swaminathan) यांनी म्हटलं होतं की,"करोनाचा संसर्ग सध्या सामूदायिक असून विषाणू अजूनही अस्तित्वात असल्याने संसर्गाची दुसरी लाट येणं अतिशय धोकादायक आहे. आपल्याला अजून हेच माहीत नाही की ही दुसरी लाट आहे की, पहिलीच लाट अद्याप अजून काही देशांमध्ये संपलेली नाही."