Main Featured

काय आहे कोल्हापुराच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

Kolhapur janata curfew

Kolhapur- कोरोनाचा फैलाव (coronavirus)रोखण्यासाठी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह विविध व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्युचे (curfew)आवाहन केले होते.या आवाहनाला शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. विरोध आणि समर्थन असे दोन गट पडल्यामुळे हा समिश्र प्रतिसाद आहेत.


कांही ठिकाणे व्यापार,उद्योग सुरु आहेत. तर कांही ठिकाणी व्यापार,दुकाने बंद असल्याचे निदर्शनास आले.अनेकदा लॉकडाउन केल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांचे,फेरीवाल्यांचे आणि ज्यांची हातावर पोटे आहेत,अशा नागरिकांचे हाल होत आहेत.

Must Read


कंगनाने शेअर केला बाळासाहेबांचा जुना VIDEO,म्हणाली......


राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच, पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या


मार्च महिन्यापासून हा त्रास नागरिकांनी काढला आहे.त्यामुळे आता बंद केला जाणार नाही,अशी भुमिका कांही व्यापारी संघटनांनी घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर आजपासून जनता कर्फ्यु (curfew)सुरु होताच,याला समिश्र प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले.

राजारामपूरी,शाहूपूरी,लक्ष्मीपूरी,भाउसिंगजी रोडसह विविध ठिकाणी या जनता कफ्युला समिश्र प्रतिसाद मिळाला. 

कोल्हापूर (kolhapur)शहरात कोरोनाचा (corona)कहर वाढत चालला आहे. शहरातील रुग्णसंख्या आता दहा हजारापेक्षा जास्त झाली आहे. सद्यस्थितीत दररोज शहरात तीनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. सर्व रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. सरकारी दवाखान्यांवरही ताण पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा दहा दिवसाचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे.