ips-officer-purushottam-sharma-relievedमध्य प्रदेशात विशेष पोलीस महासंचालकपदी ( Special Director General of Police) कार्यरत असलेले पुरुषोत्तम शर्मा  (Purushottam Sharma) यांना राज्य सरकारनं तडकाफडकी पदावरून दूर केलं आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या पुरुषोत्तम शर्मा यांचा पत्नीला मारहाण करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान  (Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांनी सांगितलं.

Must Read

1) महाविकास आघाडीत चलबिचल; पवार, थोरात मुख्यमंत्र्यांना भेटले

2) मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस photo

3) 'हा' भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत

4) 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

5) आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना बैलगाडीने प्रवास करावा लागतो..

वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा याचं नाव एका व्हायरल झालेल्या व्हिडीओनं चर्चेत आलं होतं. पुरुषोत्तम शर्मा सध्या मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेलं होतं. काही दिवसांपासून महासंचालकांचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शर्मा हे एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील महिलेला शर्मा बेदम मारहाण करताना जमिनीवर आपटतात आणि नंतर बुक्के मारतानाही दिसत आहेत.

शर्मा यांच्या पत्नीने त्यांना दुसऱ्या महिलेबरोबर (जी त्यांची प्रेयसी असल्याचे सांगण्यात येत आहे) रंगेहाथ पकडल्यानंतर या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. घरी आल्यानंतरही या दोघांमधील वाद अगदी शिगेला पोहचला. त्यामुळेच संतापलेल्या शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली.