Main Featured

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला...!

sushant singh rajputEntertainment- अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput)मृत्यूप्रकरणात आता योगगुरु रामदेवबाबा (baba ramdev)यांनी उडी घेतली आहे. सुशांत आत्महत्या (suicide)करूच शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. केवळ इतकेच नाही तर  सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव यांनी सुशांत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांची नावे आल्यावरही ते बोलले.


Must Read

1) रेशन कार्डला करा आधार लिंक, अन्यथा मोफत धान्य बंद
2) SBI-ICICI सह आज रात्रीपासून बंद होणार ही महत्त्वाची सेवा

3) रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

4) दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा
5) टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो


ही नशाखोर गँग आहे. हे ब्रँड नाही तर देशाला उद्ध्वस्त करत आहेत. यांना कोण आदर्श मानणार? यात कोण कोण आहेत, मला ठाऊक नाही. पण लवकरच ते समोर येईल, असे रामदेवबाबा म्हणाले.सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘सुशांत एक महत्त्वाकांक्षी तरूण होता, तो नशेच्या आहारी जाणारा तरूण नव्हता, तो आत्महत्या  (suicide) करूच शकत नाही. 

एक तर त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले किंवा मग त्याची हत्या झाली, सुशांत शिस्तबद्ध आयुष्य जगत होता. त्याच्यासारखा तरूण कधीच आत्महत्या करणार नाही. हे एक खूप मोठे चक्रव्युह आहे. यात तरूण पिढीला फसवून उद्धवस्त केले जाते. एखाद्याची प्रगती होत असलेली पाहून त्याला व्यसनांच्या चक्रव्युहात ओढले जाते. आपल्याला देशाला अशा प्रवृत्तींपासून वाचवायला हवे, असे रामदेवबाबा (baba ramdev) म्हणाले, एनसीबी करत असलेल्या तपासावर त्यांनी समाधान व्यक्त केले. एनसीबी लवकरच ख-या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे, असेही ते म्हणाले.


व्हिसेरा रिपोर्टमधून होणार मोठा खुलासा?

सुशांतसिंग राजपूत प्रकरणी एम्सच्या टीमने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? याचे उत्तर या अहवालातून मिळणे अपेक्षित आहे. सूत्रांचे मानाल तर सुशांतला विष देण्यात आले नव्हते. सुशांतच्या शरीरात कोणतेही  विष सापडले नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


आता एम्सच्या अहवालावर सीबीआय अंतिम निर्णय घेईल. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे राहिले नाही, असा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी केला होता. आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील.