Main Featured

राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 
Rahul Gandhi यांनी सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉटक्ट) अर्थात जीडीपीच्या घसरणीवरुन रविवारी केंद्र सरकारावर निशाणा साधला आहे. जीडीपीमधील घसणीचं एक मोठ कारण म्हणजे जीएसटी टॅक्स असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रविवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, जीडीपीच्या घसरणीचं एक मोठं कारण म्हणजे मोदी सरकारचा गब्बर सिंह टॅक्स (GST) आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेवर आपला तिसरा व्हिडीओ जारी केला आहे. व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले की, जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश आहे. गरिबांवर एकप्रकारचं आर्थिक आक्रमण आहे. छोटे छोटे दुकानदार, लहान आणि मध्यम व्यावसायिक तसेच शेतकरी आणि कामगारांवर आक्रमण आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलेय की, “GDP मध्ये एतिहासिक घसणीचं आणखी एक कारण म्हणजे मोदी सरकाराचा गब्बर सिंह टॅक्स (GST) आहे. यामुळे खूप नुकसान झालेय. लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांचं नुकसान तर झालेच आहे शिवाय कोट्यवधी नोकऱ्या आणि तरुणांचा भविष्य.. तसेच अनेक राज्यांचं भविष्य…. जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश ”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलेय की, “जीएसटी यूपीएची संकल्पना होती. कमीत कमी टॅक्स, साधारण आणि सरळ टॅक्स. NDA चा जीएसटी वेगळाच आहे. चार वेगवेळे टॅक्स त्यांनी केले आहेत. २८ टक्क्यांपर्यत टॅक्स आहे. तसेच एनडीएचा जीएसटी फॉर्मुला समजण्यास अवघड आहे. गुंतागुंतीची टॅक्स प्रक्रिया आहे. लहान व्यावसायिक इतका मोठा टॅक्स भरू शकत नाहीत. पण मोठ्या कंपन्या सहज हा टॅक्स भरतो.