Main Featured

पाकिस्तानचा स्टार खेळाडू आफ्रिदीची गोळ्या घालून हत्या


                                

पाकिस्तानमधून क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. दोन गटात झालेल्या वादात पाकिस्तानच्या स्टार खेळाडूचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील खैबर जिल्ह्यातील (Afridi shot dead)जमरूद भागात ही घटना घडली आहे. यात पाकिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू जुनैद आफ्रिदी याचा मृत्यू झाला. फुटबॉल सामना सुरू असतानाच त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

हेही वाचा 

1) इचलकरंजीत "या' संघटना आक्रमक, केली जोरदार निदर्शने

2) कोल्हापूरकरांची चिंता वाढली

3) काय आहे कोल्हापुराच्या जनता कर्फ्युची परिस्थिती

4) कोल्हापूरात तरुणाचा निर्घृण खून

5) सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला बोजवारा


पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फुटबॉल सामना सुरू असताना दोन गटात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला. यादरम्यान जुनैद आफ्रिदी याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. (Afridi shot dead)गोळीबारात अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेत एका स्टार खेळाडूचा मृत्यू झाल्याने चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.