Main Featured

सुशांतला न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही

sushant singh rajput

अभिनेता सुशांतसिंह राजपूतला (sushant singh rajput) न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असे बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुशांतला न्याय मिळणार (justice)नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली. 


आत्महत्या प्रकरणाला बिहार निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची भाजपची इच्छा नाही. पण जोवर सुशांतला न्याय मिळणार नाही तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. पहिल्यांदा भाजपच्यावतीने सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर निवडणूक मुद्द्याच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. 

Must Read

 दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनच्या तपासाने वेग घेतला आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर रियाने बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणला आहे. रियाने दिलेल्या २५ बॉलिवूडकरांच्या यादीत एनसीबीच्या रडारवर सुरुवातीला ५ जण असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात (justice) ड्रग्ज अँगलने तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडावर आता बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड बड्या सेलेब्रिटींचा पार्टीतील व्हिडिओ समोर आला होता. ही पार्टी ३० जुलै २०१९ ला करण जोहरच्या घरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओत शाहिद कपूर, विक्की कौशल, वरून धवण, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर दिसत आहेत. व्हिडिओतील त्यांच्या देहबोलीवरून त्यांनी ड्रग्ज घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एनसीबीकडून याची चौकशी होण्याची शक्यता
सुशांत मृत्यू प्रकरणाचा ईडी आणि सीबीआय तपास सुरू असतानाच ईडीकडून रिया, मिरांडा आणि शौविकचे ड्रग्ज संदर्भातले व्हॉट्सअप चॅट समोर आले आणि या तपासातलं ड्रग्ज कनेक्शन पुढे आलं. एनसीबीने याबाबत तपास सुरू करताच काही ड्रग्ज पेडलर यांच्यासोबत, एनसीबीने शौविक, मिरांडा यांना ताब्यात घेतले आणि अखेर रियाचे नावंही पुढे आल्यामुळे रियाला एनसीबीने अटक केली.
रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याचे मान्य केले. मात्र आपण ड्रग्ज घेत नसल्याचं रियाने म्हटलं होतं. मात्र रियाच्या व्हायरल व्हिडिओने ती खोटं बोलत असल्याचंही उघड झाले आहे. सुशांत, रियाचा गातानाचा व्हिडिओ ज्यात सिगरेट ओढत असल्याचे दिसत आहे.
१४ दिवसांच्या न्यायालयीत कोठडीत असलेल्या रियाने चौकशी दरम्यान २० पानांच्या जबाबात बॉलिवूडमधल्या २५ जणांची नावं एनसीबीला दिल्याची माहिती आहे. एनसीबीने बॉलिवूडमधलं हे ड्रग्ज कनेक्शन उघड करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आता रियाने दिलेल्या नावांपैकी सुरुवातीला पाच जणांची कसून चौकशी होणार असल्याचं समजते आहे. यात अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, डिजाइनर सीमोन खंभाटा, रेनड्रॉप मीडियाची प्रमुख रोहिणी अय्यर आणि कास्टिंग डिरेक्टर, स्क्रीन प्ले रायटर मुकेश छाबडा यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
बॉलिवूडमधले हे ड्रग्ज कनेक्शन एनसीबी लवकरच मार्गी लावेल. सुरूवातीला या पाच जणांची कसून चौकशी होणा असली तरीही बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमधली २० जणांची नावं अद्याप समोर यायची आहेत. त्यामुळे आता आणखी कोणाची नावं समोर येतातय याची तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे त्यापेक्षा कैक पटीने जास्त बॉलिवूडकरांची मात्र बोबडी वळली आहे.