Main Featured

कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला ८० वर्षीय आजोबांचा हॅप्पीवाला बर्थडे!


८० वर्षीय आजोबांना मिळाला सुखद धक्का

वाढदिवस म्हटले की प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. सर्वजण आपल्या प्रियजनांचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रयत्न करत असतात. याचीच प्रचिती कोल्हापुरातील 
सायबर कोविड सेंटर मध्ये आली. येथील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर करोना बाधित रुग्णांनी एका ८० वर्षांच्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवला. ( Birthday Celebration of 80 year old Grandfather at Covid Care Center)

कोल्हापूर येथील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सायबर कॉलेज येथे उभारल्या गेलेल्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये आजचा दिवस प्रकाश टोपले या आजोबांसाठी खास होता. उजळाईवाडी इथल्या ८० वर्षीय प्रकाश टोपले यांचा आज वाढदिवस होता. दरवर्षी कुटुंबीयांसोबत हे आजोबा वाढदिवस साजरा करत असतात मात्र त्यांना १० दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली. त्यांच्यावर संताजी घोरपडे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सायबर कॉलेज येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते यावर्षी आपल्या कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. हे समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता संताजी घोरपडे आणि डॉक्टर संगीता निंबाळकर यांनी कोविड सेंटरमध्ये या आजोबांच्या वाढदिवसाचा केक कापून सेलिब्रेशन केलं.

आजोबांसाठी सुद्धा हा वाढदिवस अविस्मरणीय होता. यावेळी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या कुटुंबीयांना देखील वाढदिवसात सहभागी करून घेण्यात आले.