Main Featured

बाईक वाचवण्यासाठी तरुणं जीव घातला धोक्यात, पुढे काय झालं पाहा VIDEO


बाईक वाचवण्यासाठी तरुणं जीव घातला धोक्यात, पुढे काय झालं पाहा VIDEO

उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमधील अनेका भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोधपूरमध्ये धुवाधार पावसानं 10 तासांपासून बॅटिंग केल्यामुळे नदी, नाले ओव्हर फ्लो झाले आहेत. अनेक वस्त्या, रस्ते पाण्याखाली गेले असून प्रवाह खूप वाढला आहे. आधी कोरोना आणि आता आलेल्या महापुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे.

जोधपूरमधील काही भयंकर व्हिडीओ समोर आले आहेत. भरबाजारात भाजीची हातगाडी वाहून जाताना, दुकानातील तेलाचे डबे या प्रवाहासोबत वाहून जात असल्याचं दिसत आहे. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांपैकी एक दुचाकीही वाहून गेली आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुणासह दुचाकीदेखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली आहे. यावर पाण्याचा वेग किती मोठा असेल याचा अंदाज लावाता येऊ शकतो.

जयपूर जोधपूर महामार्गावरही पूर आला त्यामुळे अनेक तास रहदारी ठप्प झाली होती. जोधपूर शहराची रचना अशी केली गेली आहे की शहरात पाणी थांबत नाही, परंतु बर्‍याच दिवसानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं पाहायला मिळत आहे.