Big Boss 14 hostEntertainment News- गेल्या काही दिवसांपासून’बिग बॉस’च्या (Big Boss)नव्या पर्वाची म्हणजेच ‘बिग बॉस १४’ची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदा या पर्वात अनेक बदल करण्यात आले असून हा शो ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 
विशेष म्हणजे या शोमध्ये करण्यात आलेल्या अनेक बदलांपैकी एक बदल सूत्रसंचालकांमध्येदेखील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या पर्वात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला होस्टच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Must Read‘बिग बॉस’ हा शो त्यात देण्यात येणारे विविध टास्क आणि खासकरुन अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan)सूत्रसंचालनासाठी ओळखला जातो. मात्र यंदा रंगणाऱ्या पर्वात सलमान खानला सिद्धार्थ शुक्लाची साथ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, अद्यापतरी याविषयी कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट करण्यात आलेली (Entertainment News)नाही.

दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस १३ चा विजेता असून आज तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या पर्वातदेखील तो दिसण्याची शक्यता असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.