Main Featured

ठरलं ! 'या' दिवशी होणार 'बिग बॉस १४'चं टेलिकास्ट

                                       salman khan and big boss


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'बिग बॉस'(Big Boss)च्या १४ व्या सिझनचा नवा प्रोमो नुकताच लॉन्च झाला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खानने (Salman Khan)या सिझनच्या टेलिकास्टचा खुलासा केला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या आणि टेलिकास्टबाबत  वेगवेगळ्या चर्चा सुरु असलेला हा सिझन लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोचा हा नवा प्रोमो चांगलाच प्रभाव टाकतोय. प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आता जवळ आला आहे.  


बिग बॉस १४' च्या (Big Boss)या नव्या प्रोमोमध्ये सलमानच्या तोंडी जबरदस्त डायलॉग्स आहेत. टेंशनचा फ्युज उडणार कारण आता सीन पलटणार असं म्हणत 'बिग बॉस २०२०'ची उत्सुकता आणखीनंच वाढवली आहे. या प्रोमोमध्ये सलमानच्या तोंडावर मास्क आहे तसेच त्याचे हात आणि पाय साखळीने बांधलेले दिसून येत आहेत. सलमान त्याचे एक एक डायलॉग म्हणत या साखळ्यांचा बंध तोडतो आणि शेवटी 'बिग बॉस १४'  शनिवार ३ ऑक्टोबर रोजी टेलिकास्ट होणार असल्याचा खुलासा करतो. 
Must Read

यावेळी 'बिग बॉस' लॉकडाऊन दरम्यानचं असल्याने काहीतरी खास असणार आहे. 'अब सीन पलटेगा' ही यावेळी शोची टॅगलाईन आहे. दररोज रात्री १०.३० वाजता आणि सलमानसोबतचा विकेंड वार रात्री ९ वाजता असणार असल्याचं चॅनलने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये म्हटलंय.
या शोमध्ये कोणते स्पर्धक असणार याचा खुलासा अधिकृतरित्या झालेला नाही. पहिल्या एपिसोडमध्ये स्पर्धकांची एंट्री होईल. मात्र असं असलं तरी काही नावांची जोरदार चर्चा आहे. यामध्ये जॅस्मीन भसीन, अली गोनी, ऐजाज खान, नेहा शर्मा, पवित्रा पुनिया, नैना सिंह या नावांचा समावेश आहे. कोरोनामुळे शोच्या थीममध्ये आणि नियमांमध्ये यावेळी काय बदल पाहायला मिळतीय याची देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.