Main Featured

कांदा प्रश्न पेटला!

bans onion  exports


केंद्र सरकारनं कांद्यावर तडकाफडकी निर्यात (export)बंदी लादली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे. निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकारी आक्रमक झाला आहे. यावर लवकरच तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठवण्यात येईल. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे


कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष रामराव भामरे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेटली. कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कांद्याचे भाव कोसळत असल्याने उत्तर महाराष्ट्र भागातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे निर्यातबंदीच्या निर्णयाचा पूनर्विचार व्हावा व निर्यात (export)बंदी उठवावी, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.


Must Read


दुसरीकडे, रयत क्रांती संघटना अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात कांद्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे आक्रमक आंदोलन सुरू झालं आहे. देशाच्या सीमेवर रोखलेले सर्व कांद्याचे कंटेनर त्वरीत परदेशात पाठवा नाहीतर एकही केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्याला फिरू देणार नाही, असा थेट इशारा या आंदोलकांनी दिला आहे.