Main Featured

पुणे जिल्ह्यात 29 लाखांचा फिल्मी स्टाईल दरोडा उघड


bank-robbery-Film-style-robbery-exposed

bank robbery दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापरू करून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 29 लाखांचा झालेला सिनेस्टाईल दरोडा Robbery उघड केला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये पोलिसांना ग्रामसुरक्षा यंत्रणा वापरून दरोड्यातील आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. 29 ऑगस्टला महामार्गावर High street दुचाकी गाड्यांवर येऊन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो ड्रायव्हरकडून 29 लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले होते. त्यानंतर दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला चोरीचा संदेश दिला असता त्याच दिवशी एका आरोपीस अटक करण्यास मदत झाली होती. यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखत अधिक तपास करीत गुन्ह्यातील 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर एकाच नंबरच्या 2 पल्सर तर अन्य नंबर नसलेली एक दुचाकी जप्त केली आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद गावच्या हद्दीमध्ये पुण्याहून सोलापूरच्या दिशेने पोल्ट्रीचे खाद्य आणण्यासाठी निघालेल्या टेम्पोचा ड्रायव्हर लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबला असता हत्यारबंद चोरट्यांनी दुचाकींवर येऊन चालकास धाक दाखवत त्याच्याकडील 29 लाखांची रोकड लुटून पळ काढला होता.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा कसा झाला फायदा?

पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना चोरीच्या घटनेबाबतची माहिती समजताच त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला चोरी झाल्याचा संदेश दिला. या संदेशाद्वारे ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच वेळी साठ हजार लोकांपर्यंत पोहचला आणि याचवेळी पाटस टोल नाकाकडून बारामती मार्गाकडे जाणाऱ्या एका नागरिकाने हा संदेश ऐकला आणि संदेशात ऐकल्याप्रमाणे त्याच वर्णनाची मोटारसायकल दिसल्याने तिचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी मोटारसायकल तिथेच सोडून शेजराच्या शेतात पळ काढला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तिथं पाहणी केली असता याठिकाणी 8 लाख 28 हजार इतकी रक्कम बॅगेमध्येमध्ये मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी अधिक तपास केला असता पाटस पोलिसांनी एका आरोपीला आणि नंतर चार आरोपींना पकडण्यात यश आले. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने आरोपी पकडण्याची व असा प्रकार उघडकीस येण्याची पुणे जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.